विषय तज्ञ: श्री मनोज हाडवळे, संस्थापक, पराशर ॲग्री & कल्चर टुरिझम
आढावा: हवामान बदलाचा शेताला आणि शेतकऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय गंभीर आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकर्यांनी त्यांच्या मूळ शेती उत्पन्नावर जास्त अवलंबून न राहता अतिरिक्त उत्पन्नाचे नवीनतम मार्ग शोधले पाहिजेत. असाच एक मार्ग आहे कृषी पर्यटनाचा. शेतकऱ्यांचा खर्च न वाढवता त्यांच्या शेतातून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येईल ह्या संदर्भात हा कोर्स अतिशय उपयुक्त आहे. कृषी पर्यटन ही केवळ पहिली पायरी आहे. आपल्याच शेतात शेतकऱ्यांना अशा अनेक मूल्यवर्धित सेवा किफायतशीरपणे देता येतील. तर आजच मात्र ९९९/- रुपयांची गुंतवणूक करा व शेतीपूरक उत्पन्नामार्गे आजन्म परतावा मिळवा.